Posts

Showing posts from April, 2021

त्रिदल -सतेज दणाणे

Image
  त्रिदल हा डॉ बाबुराव गायकवाड यांनी भाषांतरित केलेल्या कन्नड नाटकांची समीक्षा केलेला डॉ.सतेज दणाणे   यांचा ग्रंथ आहे.मानवी जीवनाची मुल् यात्मकता हे सूत्र या नाटकांचा गाभा असल्याने ग्रामीण शहरी आणि सर्व प्रांतातील माणसांचे मन परिवर्तन होण्यासाठी उपदेश देणारे म्हणून हा ग्रंथ उपयुक्त ठरेल.

21 शतकातील आंबेडकरी काव्य-डॉ.सतेज दणाणे

Image
 21 शतकातील आंबेडकरी काव्य हा डॉ.सतेज दणाणे यांनी आंबेडकरी विचाराच्या कवितेचे मौलिक असे संपादन केले आहे. आंबेडकरी विचारा चा काव्य प्रवाह 21 शतकात अधिक गंभीर आणि दिशादर्शक ठरणारा आहे. त्या  नुसत्या कवि ता नाहीत तर आंबेडकरी विचार आहेत .

मागोवा'

Image
 मागोवा' हा डॉ बाबुराव गायकवाड यांच्या साहित्याची समीक्षा करणारा ग्रंथ आहे. डॉ सतेज दणाणे यांनी गायकवाड यांची कथा, कविता, नाटक, ललित लेखन, आत्मकथन, मुलाखत, अनुवादित आणि संपादित साहित्य अशा साहित्याची आस्वादक स्वरूपाची समीक्षा केली आहे.

भटक्या जमातीच्या स्त्रियांची आत्मकथने - डॉ.सतेज दणाणे

https://waruljournal.blogspot.com/2021/04/blog-post.html  

भटक्या जमातीच्या स्त्रियांची आत्मकथने

Image
 डॉ.सतेज दणाणे हे कृतिधर्मी व्‍यक्तिमत्‍त्‍व. सामाजिक व वाङ्मयीन ऊर्मी त्यांना कधीही स्वस्थ बसू देत नाही. सामाजिक कार्य असो वा ‘वारूळ’ सारखे दर्जेदार वाङ्मयीन नियतकालिक असो, दोहोंच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक व वाङ्मयीन क्षेत्रात आपली मुद्रा उमटवली आहे. त्यांच्‍या सामाजिक व वाङ्मयीन क्षेत्रातील सक्रियतेतून त्यांचा ‘भटक्या जमातीतील स्त्रियांची आत्मकथने’ हा अभ्यासग्रंथ सिद्ध झाला आहे.                         ‘आत्म‍कथन’ या संज्ञेने मराठी साहित्याचा परिघ विस्तारला. चाकोरीबद्ध आत्मचरित्रांच्‍या आशय, विषय, आकृतिबंध व भाषिक सीमारेषा ओलांडल्या.  आत्‍मकथनांनी केलेले ऐतिहासिक सीमोल्लंघन हेे डॉ.दणाणेंच्‍या विवेचनाचे मुख्‍य सूत्र आहे. भटक्या  समाजातील स्त्रियांच्या आत्मकथनांचे विवेचन करताना त्यांंनी स्वीकारलेला सामाजिक, सांस्‍कृतिक व भाषिक परिप्रेक्ष्य अत्यंत महत्‍त्वाचा आहे. ‘मरणकळा’ व ‘तीन दगडाची चूल’ या आत्मकथनांनी भटक्‍यांचे भावविश्व व बोलीद्वारे मराठी साहित्‍य व भाषावैभवामध्ये कशा प्रकारे समृद्ध केले, याचे समर्पक...