Posts
ललित लेखन
- Get link
- X
- Other Apps
'डॉ. बाबुराव गायकवाड यांचे ललितलेखन ' डॉ.बाबुराव गायकवाड यांनी साहित्याच्या विविध प्रवाहात विपुल लेखन केले आहे. कथासंग्रह, कादंबऱ्या, नाटके, काव्यसंग्रह,समीक्षा ग्रंथ, अनुवादित लेख, ललित लेख इत्यादी प्रकारचे लेखन त्यांनी केले आहे. यापैकी त्यांच्या ललित लेखनाला संबंधीच्या प्रसिद्ध झालेल्या पुस्तकातून निवडक लेख घेऊन प्रा.सतेज दणाणे यांनी ' बाबुराव गायकवाड यांचे ललित लेखन ' हे पुस्तक लिहिले आहे. हलकं-फुलकं, पुन्हा एकदा हलकं फुलकं, सरमिसळ, बाकी काही इत्यादी पुस्तकातील ललित लेखनातून निवड केली आहे. सतेज दणाणे लिहितात, डॉ.गायकवाड यांनी केलेले ललितलेखन हे मराठी साहित्यातील ललित लेखनापेक्षा आशय, विषय, मांडणी अशा सर्वच दृष्टीने वेगळे आहे. त्यांचे ललितलेख कोणत्यातरी गोष्टींचा, शब्दांचा मुळापासून शोध घेतात. विरोधी शब्दातीत साधर्म्य आणि विविधता शोधतात... स्वतःच्या जीवनातील घटना यांची मांडणी ते एकसलग करतात.स्वतःच्या जीवनातील अनुभव सांगत सांगत ललितलेख पुढे- पुढे सरकत राहतो आणि मूळ विषयातील यथार्थता दाखवून किंवा त्याचा आजच...
Satej https://waruljournal.blogspot.com/2022/02/blog-post_6.html
- Get link
- X
- Other Apps
‘भटक्या जमातीच्या स्त्रियांची आत्मकथने’
- Get link
- X
- Other Apps
https://waruljournal.blogspot.com/2021/04/blog-post.html डॉ.सतेज दणाणे हे कृतिधर्मी व्यक्तिमत्त्व. सामाजिक व वाङ्मयीन ऊर्मी त्यांना कधीही स्वस्थ बसू देत नाही. सामाजिक कार्य असो वा ‘वारूळ’ सारखे दर्जेदार वाङ्मयीन नियतकालिक असो, दोहोंच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक व वाङ्मयीन क्षेत्रात आपली मुद्रा उमटवली आहे. त्यांच्या सामाजिक व वाङ्मयीन क्षेत्रातील सक्रियतेतून त्यांचा ‘भटक्या जमातीतील स्त्रियांची आत्मकथने’ हा अभ्यासग्रंथ सिद्ध झाला आहे. ‘आत्मकथन’ या संज्ञेने मराठी साहित्याचा परिघ विस्तारला. चाकोरीबद्ध आत्मचरित्रांच्या आशय, विषय, आकृतिबंध व भाषिक सीमारेषा ओलांडल्या. आत्मकथनांनी केलेले ऐतिहासिक सीमोल्लंघन हेे डॉ.दणाणेंच्या विवेचनाचे मुख्य सूत्र आहे. भटक्या समाजातील स्त्रियांच्या आत्मकथनांचे विवेचन करताना त्यांंनी स्वीकारलेला सामाजिक, सांस्कृतिक व भाषिक परिप्रेक्ष्य अत्यंत महत्त्वाचा आहे. ‘मरणकळा’ व ‘तीन दगडाची चूल’ या आत्मकथनांनी भटक्यांचे भाववि...