ललित लेखन
'डॉ. बाबुराव गायकवाड यांचे ललितलेखन '
डॉ.बाबुराव गायकवाड यांनी साहित्याच्या विविध प्रवाहात विपुल लेखन केले आहे. कथासंग्रह, कादंबऱ्या, नाटके, काव्यसंग्रह,समीक्षा ग्रंथ, अनुवादित लेख, ललित लेख इत्यादी प्रकारचे लेखन त्यांनी केले आहे. यापैकी त्यांच्या ललित लेखनाला संबंधीच्या प्रसिद्ध झालेल्या पुस्तकातून निवडक लेख घेऊन प्रा.सतेज दणाणे यांनी ' बाबुराव गायकवाड यांचे ललित लेखन ' हे पुस्तक लिहिले आहे. हलकं-फुलकं, पुन्हा एकदा हलकं फुलकं, सरमिसळ, बाकी काही इत्यादी पुस्तकातील ललित लेखनातून निवड केली आहे.
सतेज दणाणे लिहितात, डॉ.गायकवाड यांनी केलेले ललितलेखन हे मराठी साहित्यातील ललित लेखनापेक्षा आशय, विषय, मांडणी अशा सर्वच दृष्टीने वेगळे आहे. त्यांचे ललितलेख कोणत्यातरी गोष्टींचा, शब्दांचा मुळापासून शोध घेतात. विरोधी शब्दातीत साधर्म्य आणि विविधता शोधतात... स्वतःच्या जीवनातील घटना यांची मांडणी ते एकसलग करतात.स्वतःच्या जीवनातील अनुभव सांगत सांगत ललितलेख पुढे- पुढे सरकत राहतो आणि मूळ विषयातील यथार्थता दाखवून किंवा त्याचा आजच्या परिस्थितीचा विचार सांगून लेख संपतो .. साध्या साध्या गोष्टींवर ते सविस्तर मांडणी करतात.' (पृ.19) ' डॉ.गायकवाड यांच्या लेखनात खुसखुशीत विनोदी येतात.'( पृ.23)
' डॉ.गायकवाड यांच्या ललित साहित्यात प्रतिमा,प्रतीके, उपमा मोठ्या प्रमाणात आलेले आहेत.' (पृ.25)
'डॉ. बाबुराव गायकवाड यांच्या लेखनातून हा अफाट शब्दसंपत्ती उपलब्ध होते. म्हणी, वाक्प्रचार यामधून मोठ्या घटनेचा आशय थोडक्यात मांडलेला दिसतो. '(पृ.28)
प्रा.सतेज दणाणे यांनी निवड केलेल्या या पुस्तकातील लेखातून वरील अभिप्रायाची सत्यता दिसून येते.
- डॉ.भा. वा.आठवले
( देवदुर्ग साप्ताहिक, देवगड मधून साभार ) -
Comments
Post a Comment