Posts

Showing posts from January, 2022

‘भटक्या जमातीच्या स्त्रियांची आत्मकथने’

Image
https://waruljournal.blogspot.com/2021/04/blog-post.html          डॉ.सतेज दणाणे हे कृतिधर्मी व्‍यक्तिमत्‍त्‍व. सामाजिक व वाङ्मयीन ऊर्मी त्यांना कधीही स्वस्थ बसू देत नाही. सामाजिक कार्य असो वा ‘वारूळ’ सारखे दर्जेदार वाङ्मयीन नियतकालिक असो, दोहोंच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक व वाङ्मयीन क्षेत्रात आपली मुद्रा उमटवली आहे. त्यांच्‍या सामाजिक व वाङ्मयीन क्षेत्रातील सक्रियतेतून त्यांचा ‘भटक्या जमातीतील स्त्रियांची आत्मकथने’ हा अभ्यासग्रंथ सिद्ध झाला आहे.                         ‘आत्म‍कथन’ या संज्ञेने मराठी साहित्याचा परिघ विस्तारला. चाकोरीबद्ध आत्मचरित्रांच्‍या आशय, विषय, आकृतिबंध व भाषिक सीमारेषा ओलांडल्या.  आत्‍मकथनांनी केलेले ऐतिहासिक सीमोल्लंघन हेे डॉ.दणाणेंच्‍या विवेचनाचे मुख्‍य सूत्र आहे. भटक्या  समाजातील स्त्रियांच्या आत्मकथनांचे विवेचन करताना त्यांंनी स्वीकारलेला सामाजिक, सांस्‍कृतिक व भाषिक परिप्रेक्ष्य अत्यंत महत्‍त्वाचा आहे. ‘मरणकळा’ व ‘तीन दगडाची चूल’ या आत्मकथनांनी भटक्‍यांचे भाववि...